Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeकोंकणठाणेकल्याणमध्ये संस्कार बिल्डर्सच्या अनधिकृत चाळीवर बुल्डोझर फिरणार

कल्याणमध्ये संस्कार बिल्डर्सच्या अनधिकृत चाळीवर बुल्डोझर फिरणार

कल्याण : संस्कार बिल्डरचे सर्वेसर्वा नितीन पाटील यांनी कल्याणमध्ये भोगवटा वर्ग २ च्या जमीनिनीवर घर बांधून विकण्याचा सपाटा लावला होता. ज्या जमिनीवर चाळ उभारली होती ती अनधिकृत होती. त्या चाळीमध्ये महावितरणाच्या अधिका-यांनी नितीन पाटील यांच्याशी चिरीमिरी करुन रहिवाशांना इलेक्ट्रीक मीटर दिले. या सर्व भोंगळ कारभाराबद्दल कल्याण डोंबिवली महापालिकेला, जिल्हाधिका-यांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता त्या चाळीवर बुल्डोझर फिरवले जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

कल्याण पश्चिमध्ये साई बाबा मंदिर, वाडेघर पाडा पाईपलाईन पाणबुड्या नगर, सापाड येथे भोगवटा २ च्या जमिनिचा वापर बिल्डरने इमारत बांधून विकण्याचा पराक्रम केला होता. जमिनीवर कसणे आणि उत्पन्न खाणे एवढेच अधिकार आहेत. मात्र, बिल्डराने सर्व नियम धाब्यावर बसवून त्या जमिनीवर अनधिकृतपणे बांधकामाच्या नावार शेकडो लोकांकडून लाखो रूपये उकळले. शेकडो लोकांनी घरासाठी बिल्डरला पैसे दिले. बिल्डरने काही ठिकाणी चॉल बांधून त्याची विक्रीही केली. अशी तक्रार फसवणूक झालेल्या नागरिकांनी दैनिक मुंबई कार्यालयाकडे केली होती. हा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला होता.

कल्याण पश्चिमध्ये साई बाबा मंदिर, वाडेघर पाडा पाईपलाईन पाणबुड्या नगर, सापाड येथे भोगवटा २ च्या जमिनिचा वापर बिल्डरने इमारत बांधून विकण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे तेथे आरसीसीमध्येही काही बांधकाम करण्यात आले आहे. खोट्या जाहिराती देवून लोकांना आकर्षित केले. गोर गरिबांनी घरासाठी आयुष्याची पुंजी त्यामध्ये लावली. घरासाठी बिल्डरकडे पैसे जमा केले. मात्र बिल्डर आज बांधकाम सुरु करु उद्या सुरु करु असे सांगून वेळ मारून नेली. त्यामध्ये कित्येक लोकांचे पैसे बुडाले, काहींना चेक दिले ते बाऊंस झाले होते. त्याविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या सर्व प्रकरणी डॉ. वैदेही तामण यांनी याचिका दाखल केली होती. नितीन पाटील यांनी नागरिकांची फसवणूक केली. चेक बाऊंस आणि फसवणूक प्रकरणी ठाणे न्यायालयात जाणार आहेत. न्याय मिळावा. नितीन पाटलांना शिक्षा व्हावी याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी पाऊल उचलले आहेत. त्यामुळे नितीन पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सरकार एकीकडे सगऴ्यांना हक्काचे घर बांधून देण्यासाठी विविध योजना राबवत आहे, तर दुसरीकडे खासगी बिल्डर्स शासनाच्या जमिनीवरच गैरप्रकारे घरे बांधून कोटयवदीचा मलिदा लाटत आहेत. यामुळे बिल्डर सरकारची फसवणूक करत असून अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी फसवून झालेल्या नागरिकांनी माध्यमांकडे केली होती. जिल्हाधिका-यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेला दिले होते. त्यानंतर लवकरच त्या बिल्डरवर कारवाई केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments