Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeकोंकणठाणेरंग मल्हार…पावसाच्या साथीने सूरांच्या संगतीत चिंब भिजूया…

रंग मल्हार…पावसाच्या साथीने सूरांच्या संगतीत चिंब भिजूया…

rasik प्रतिनिधी-संगीत ते व्यक्त करते जे सांगितले जाऊ शकत नाही…. जेथे शब्द कमी पडतात तेथे संगीत बोलते….धुवांधार पावसात मल्हार रागाचे सूर आळवत सूरांच्या संगतीत पावसाळी संगीत अनुभवण्याची संधी रसिकांना येत्या शनिवारी मिळणार आहे. अस्मी स्टूडीओ घेऊन येत आहे अश्या संगीताची अभिव्यक्ति सादर करणारा कार्यक्रम ठाण्यातील सहयोग मंदिर २ मजला येथे , शनिवार १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता. रसिक श्रोत्यांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य आहे. हया कार्यक्रमात श्री विवेक सोनार यांचे बासरी वादन होणार असून तबलावर साथ अनुतोष दिघारीया देतील. त्यानंतर पंडीत राम देशपांडे यांचे सुश्राव्य गायन होईल व त्यांना तबला यती भागवत व हार्मोनियमवर अनंत जोशी साथ देतील. अस्मी स्टुडीओ व ८के मल्टिमिडीया यांच्यातर्फे सर्व रसिकांना या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments