Thursday, March 28, 2024
Homeकोंकणठाणेकाँग्रेसकडे बहुमत मात्र महापौर कोणार्क विकास आघाडीचा

काँग्रेसकडे बहुमत मात्र महापौर कोणार्क विकास आघाडीचा

After swearing in ceremony Mahavikasaghadi will hold first cabinet meeting at Sahyadriभिवंडी: काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्तास्थापन केली. मात्र, भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी महापौर निवडणुकीत आपले उमेदवार उभे केल्याचं पहायला मिळालं. धक्कादायक म्हणजे महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत असतानाही महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आहे. तर अवघे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार महापौर बनल्या आहेत.

भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदासाठी काँग्रेस पक्षाने रिषिका रांका यांना उमेदवारी दिली. शिवसेनेकडून वंदना काटेकर यांनी आपला अर्ज दाखल केला होता. तर कोणार्क विकास आघाडीकडून प्रतिभा पाटील यांनी महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ९० नगरसेवक असलेल्या भिवंडी मनपात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक म्हणजेच ४७ नगरसेवक आहेत त्यामुळे काँग्रेस उमेदवार विजयी होणार असा सर्वांनाच विश्वास होता. मात्र, काँग्रेस पक्षाच्या १८ नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.

भिवंडी महापालिकेत याआधी काँग्रेसचे जावेद दळवी महापौर आणि शिवसेनेचे मनोज काटेकर उपमहापौर होते. मात्र, महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेवर आली असताना भिवंडी महापालिकेत शिवसेना, काँग्रेस एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. तर, काँग्रेसच्या वैशाली म्हात्रे यांनी बंडखोरी करून अर्ज भरला होता. मात्र, मतदानाआधी शिवसेनेच्या वंदना काटेकर व काँग्रेसच्या वैशाली म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळं काँग्रेसचा उमेदवार सहज निवडून येईल, असा अंदाज होता. ९० सदस्यांच्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसकडे तब्बल ४७ नगरसेवक आहेत. मात्र, तब्बल १८ नगरसेवक फुटल्यानं निकाल फिरला. कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना ४९ तर, काँग्रेसच्या रिषिका रांका यांना ४१ मते मिळाली. अशाप्रकारे अवघे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवाराचा महापौर निवडणुकीत विजय झाला आहे.

तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे इम्रान वली मोहम्मद खान यांचा विजय झाला आहे. त्यांना ४९ मते मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार बाळाराम चौधरी यांना उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ४१ मते मिळाली.

भिवंडी महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस – ४७
भाजप – २०
शिवसेना – १२
कोणार्क विकास आघाडी – ४
आरपीआय – ४
समाजवादी पक्ष – २
अपक्ष – १

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments