Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeकोंकणठाणेधनगर प्रतिष्ठानचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

धनगर प्रतिष्ठानचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाचा खर्च पुरग्रस्तांना

ठाणे – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराने हाहाकार घातल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.धनगर प्रतिष्ठान,ठाणे यांच्या वतीने देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम न करता होणार खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यामुळे शेकडो कुटुंबांना घराबाहेर पडावे लागले आहे. या सर्व नागरिकांच्या मदतीसाठी यंदा मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी अत्यंत साध्य पद्धतीने साजरी करण्यात आली.पुण्यतिथी निमित्त दरवर्षी धनगर समाजातील 10 वी,12 वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम करण्यात येतो हा कार्यक्रम यंदा रद्द करून कार्यक्रमाला येणारी खर्चाची रक्कम कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे. प्रतिष्ठान तर्फे तसेच कार्यकर्ते, समाजबांधव यांनी केलेल्या मदतीच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील शाळकरी मुलांना शैक्षणिक किट देण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकाळात जनतेच्या हिताची कामे केली.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धनगर प्रतिष्ठाने पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून १६ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सांगली येथे जाऊन पूरग्रस्त नागरिकांच्या मुलांना शैक्षणिक संच ( किट ) देणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी सांगितले. 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments