Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeकोंकणठाणेहिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव संपन्न

हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव संपन्न

ठाणे- बाळ गोपाळ मित्र मंडळ सह नारळवाला चाळ, ठाणे व पुनर्जिवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव-2019 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आयोजक रक्तकर्ण विलास ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, 19 ऑगस्ट 2018 रोजी शिवाजी मैदान, मासुंदा तलाव, जांभळी नाका, ठाणे येथे सदर दहीहंडी महोत्सव संपन्न झाला. यंदाचे या महोत्सवाचे 28 वे वर्ष होते.

या महोत्सवाला पॅरा ऑलिम्पिक गेम-2018 मधील सुवर्णपदक विजेता तथा भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य (ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर) अशोक भोईर, शिवसेना उपनेते अनंत तरे, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, आयोजक विलास ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.

12 दिव्यांग शाळांतील 378 विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी यांची नाष्टा तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या महोत्सवाच्या वेळी उपस्थित गरजूंना वह्या व औषधे वाटप करण्यात आली. तसेच उपस्थित पालक आणि नागरिकांना अवयवदानाबाबत मार्गदर्शन करून इच्छूकांकडून अवयवदानाचे फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी 98 जणांनी अवयवदानाचे फॉर्म भरले अशी आयोजक तथा बाळगोपाळ मित्र मंडळाचे अध्यक्ष विलास ढमाले यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments