Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणठाण्यात कचराकुंडीत सापडले नवजात अर्भक

ठाण्यात कचराकुंडीत सापडले नवजात अर्भक

thane-news, new born baby, baby foundठाणे : ठाण्यात हरिश्चंद्र राऊत शाळेजवळील कचरा कुंडीत आज पहाटे एक नवजात अर्भक सापडलं. अवघ्या काही तासांचे अर्भक मृतावस्थेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरी पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेतलं. अर्भक रुग्णालयत पाठवण्यात आलं आहे. पहाटे ठाण्यात कचरा कुंडीजवळ नवजात अर्भक सापडल्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आता पोलीस अर्भक कचराकुंडीत कोणी फेकलं हे शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहेत. दरम्यान, घटनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments