Friday, March 29, 2024
Homeकोंकणठाणे22 ऑगस्ट रोजी ठाण्यात 100 महिलांचा गौरव होण

22 ऑगस्ट रोजी ठाण्यात 100 महिलांचा गौरव होण

ठाणे – समान संधीचा लढा यशस्वी झाल्यावर महिलांनी आपल्या सर्वांगिण विकासाचा निर्धार केला. आज त्यांच्यापैकी अनेक जणी उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. अशा कर्तृत्ववान भगिनींची नोंद कलानिधी आणि ठाणेवैभव यांनी घेण्याचे ठरवले. शंभर `वुमन सबस्टन्स` पुरस्काराने महिलांचा सत्कार करण्यासाठी सौ. अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेला कलानिधी अमित काडिया, ठाणेवैभव चे निखिल बललळ आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या परिषा सरनाईक उपस्थित होते. खडतर मार्गाने गेलेल्या आणि असंख्य आव्हाने पेलून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱया महिलांना ठाणेवैभवने शोधून काढले. कलानिधीने या उपक्रमास सहाय्य केले.

या अभिनव उपक्रमाची सांगता करताना त्यास सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात येत आहे. नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या कर्परोग विषयी काम करणाऱया संस्थेला मदत करण्यात येणार आहे. गेली 45 वर्षे प्रसिद्ध होणाऱया ठाणेवैभव म्हणजेच लोकशाहीचा चौथा स्तंभ, अर्थकारणात असणारी कलानिधी सारखी संस्था आणि विहंग चँरिटेबल ट्रस्ट यांच्या मिलाफातून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.

गडकरी रंगायतन येथे गुरुवारी 22 आँगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 7दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यास पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित राहणार आहेत. यावेळी निरनिराळ्या पारंपारिक साड्या परिधान करुन महिला भगिनी रॅम्प वर उतरणार आहेत. —

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments