Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeकोंकणठाणेठाणे महापौर वर्षा मँरेथाँन यशस्वी करण्यासाठी पोलीस व वाहतूक विभागाने सहकार्य करावे...

ठाणे महापौर वर्षा मँरेथाँन यशस्वी करण्यासाठी पोलीस व वाहतूक विभागाने सहकार्य करावे – महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे: रविवार 18 ऑगस्ट रोजी होत असलेल्या ठाणे महापौर वर्षा मँरेथाँनमध्ये सहभागी होणाऱया स्पर्धकांना स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचावाहतूकीचा अडथळा होवू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे मँरेथाँन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस व वाहतूक पोलीसांनीसहकार्य करावे अशा सूचना महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आज झालेल्या बैठकीदरम्यान दिल्या.

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी ’ठाणे महापौर वर्षा मँरेथाँन 2018’ चे आयोजनकरण्यात आले होते. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सभागृह नेते नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे,  नगरअभियंतारविंद्र खडताळे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, वाहतूक नियंत्रण विभागाचे सहाय्यक आयुक्त, तसेच ठाणे महापालिका हद्दीतील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीसनिरीक्षक उपस्थित होते.

महापालिका मुख्यालयाजवळून सकाळी 6.30 वा. या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. मुख्यालयापासून ही स्पर्धा तीन हात नाका मार्गे, वागळे इस्टेट, वर्तकनगर येथूनघोडबंदर मार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे. स्पर्धेच्या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॉरिगेटस् लावणे, स्पर्धा मार्गावर सेवा रस्त्यावरअनधिकृतपणे पार्किंग करण्यात आलेल्या गाडय़ांवर कारवाई करणे, पोलीस विभागाने देखील बंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी पुरविणे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments