Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeकोंकणठाणेवाफगावचा होळकर वाडा होणार संरक्षित स्मारक, पुरातत्व विभागाने घेतली दाखल

वाफगावचा होळकर वाडा होणार संरक्षित स्मारक, पुरातत्व विभागाने घेतली दाखल

धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेच्या मागणीला यश

holkar vadaठाणे : पुण्यातील वाफगाव येथील आद्य स्वातंत्र्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर जन्मस्थान असलेल्या होळकर वाड्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने करण्यात आ होती याची दखल शासनाने घेतली असून कारवाई सुरु केली आहे.

होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा वाडा होय. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या राज्यकाळात बांधला.हा किल्ला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मस्थान असलेला होळकर वाडा आहे या किल्ल्याची (वाड्याची) दुरवस्था झाली असून शासनाचे याकडे दुर्लक्ष करीत आहे.यासाठी हा वाडा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावा याबाबत धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्याकडे आपले सरकार ऍप्सवरून मागणी करण्यात आली होती.तसेच आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता याची दाखल घेऊन पुरातत्व विभाग,पुणे यांनी यशवंतराव होळकर वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेकामी आवश्यक कारवाई सुरु केली आहे.

सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांनी यशवंतराव होळकर वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेकामी आवश्यक महसूल दस्तावेज मिळणेबाबत तहसीलदार,खेड जिल्हा पुणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. मागणी करण्यात आलेले महसुली दस्तावेज कार्यालयास प्राप्त होतास वाडा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेकामी पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांनी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांना लेखी पत्र देऊन दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments