Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeकोंकणठाणेकोळी, आगरी, आदिवासींना जमिनीचा हक्क नाकारणारे हिदुत्व आम्ही नाकारतो - राजाराम पाटील...

कोळी, आगरी, आदिवासींना जमिनीचा हक्क नाकारणारे हिदुत्व आम्ही नाकारतो – राजाराम पाटील आगरी कोळी अदिवासी जनतेने क्लस्टर योजने विरोधात पुकारला एल्गार !

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे जिल्ह्यातील सत्ता ही बिल्डर व क्लस्टर धार्जीणी आहे त्यामुळेच  आदिवासी ,कोळी आणि आगरी यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत आणि सत्ताधारी बहुजनांच्या जमीन हक्कासाठी काहीही करणार  नाही तेव्हा असे हिंदुत्व आम्हाला नको ही इच्छा सर्व कोळी आगरी आदिवासी बांधवांमध्ये आहे. त्याची झलक येत्या विधानसभा निवडणूकीत ती दिसेल, असा इशारा आगरी कोळी समाजाचे लढवय्ये नेते वंचित बहुजन आघाडी राज्य सचिव राजाराम पाटील यानी प्रस्थापित  राजकीय नेते यांना दिला आहे .

ठाण्याच्या गडकरी रंगयातनमध्ये  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जमीन हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधीत करताना ते बोलत होते.  ठाणे जिल्हा आयोजित जमीन हक्क परिषदेत बोलत होते.
ठाणे जिल्हा आणि शहर पातळीवर क्लस्टर, एस आर ए योजने बाबत जनतेत अधिच आपली घरे दुकाने जातील ही भीति आहे तसेच एम आय डी सी च्या जमीनीवर हजारो जनतेची घरं आहेत तर कोळी आगरी आदिवासी जनतेची पिढ्यां न पिढ्यां गावठाण आहेत. ह्या जमीनी लुटण्यासाठी विविध योजनेच्या नावाखाली जनतेला फ़सविले जात आहे  ह्या पार्श्वभूमीवर जमीन हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी वतीने ठाणे जिल्हा वतीने जमीन हक्क परिषद आयोजित केली गेली होती.
यावेळी  शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरु व व्हिबीए संसदीय मंडळ सदस्य डॉ अरुण सावंत यानी,  भाजपा-सेना सरकारचे धोरण हे भूमिपुत्र जनतेच्या विरोधात आहे. सबंध कोस्टल प्रकल्प हा आगरी कोळी आणि आदिवासी लोकांना उध्वस्त करणारा  निसर्गाचे नाश करणारा असल्याचे ते म्हणाले.

ह्या परिषदेत निर्वासित शिख समुदाय यानी देखील, आम्ही  वंचित आहोत आमचा देखील जमिनिचा प्रश्न आहे,अशी व्यथा मांडत वंचित बहुजन आघाडी सोबत राहणार असल्याची ग्वाही नेते सुरजितसिंग लभाणा यानी दिली.
ह्या परिषदेत आगरी समाजाचे नेते चंद्रकांत वैती  यांनी देखील जमीन हक्क मिळवण्यासाठी आगरी समाज वंचित सोबत राहिल यांची खात्री दिली. सदर कार्यमात ठाणे जिल्ह्यातील भारिप चे रिपब्लिकन सेनासह समता सैनिक दल वंचित चे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आगरी कोळी आदिवासी बांधव  उपस्थित होते. परिषदेत सर्वानुमते जमीन हक्कासाठी ठराव केला गेला तो शासनाकडे तात्काळ पाठविला जाणार असल्याची घोषणा राजाराम पाटील यानी केली. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण यांनी केली. राजाभाऊ चव्हाण म्हणाले, आज ठाण्यातील दलित, आदिवासी, आगरी कोळी बांधवांच्या जमिनींवर बिल्डर लॉबीचा डोळा आहे. त्यातूनच क्लस्टर नावाचे भूत उभे केले आहे. मात्र, हे भूत आम्ही जमिनीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही.

ही परिषद यशस्वी करण्यासाठी सुखदेव उबाळे, जयवंत बैले, श्याम सोनावर, गोविंद पठारे, सुरेश कांबळे,  अमर आठवले, राहुल घोडके, राजकुमार मालवी, गोपाळ विश्वकर्मा यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments