Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणसंस्कार बिल्डर्सचा प्रताप : कसून खायच्या शेतजमिनीवर घर बांधलेल्या शेतक-यांवर कारवाईचे आदेश

संस्कार बिल्डर्सचा प्रताप : कसून खायच्या शेतजमिनीवर घर बांधलेल्या शेतक-यांवर कारवाईचे आदेश

कल्याण : संस्कार बिल्डरचे सर्वेसर्वा नितीन पाटील यांनी कल्याणमध्ये भोगवटा वर्ग 2 च्या जमीनिनीवर घर बांधून विकण्याचा सपाटा लावला. विशेष म्हणजे ती जमिनीवर कसणे आणि उत्पन्न खाणे एवढेच अधिकार आहेत. मात्र, बिल्डराने सर्व नियम धाब्यावर बसवून त्या जमिनीवर अनधिकृतपणे बांधकामाच्या नावार शेकडो लोकांकडून लाखो रूपये उकळले. शेकडो लोकांनी घरासाठी बिल्डराल पैसे दिले. बिल्डरने काही ठिकाणी चॉल बांधून त्याची विक्रिही केली. अशी तक्रार फसवणूक झालेल्या नागरिकांनी दैनिक मुंबई कार्यालयाकडे केली आहे. हा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला.

कल्याण पश्चिमध्ये साई बाबा मंदिर, वाडेघर पाडा पाईपलाईन पाणबुड्या नगर, सापाड येथे भोगवटा 2 च्या जमिनिचा वापर बिल्डरने इमारत बांधून विकण्याचा पराक्रम केला. खोट्या जाहिराती देवून लोकांना आकर्षित केले. गोर गरिबांनी घरासाठी आयुष्याची पुंजी त्यामध्ये लावली. घरासाठी बिल्डरकडे पैसे जमा केले. मात्र बिल्डर आज बांधकाम सुरु करु उद्या सुरु करु असे सांगून वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे हा बिल्डर बनवाबनवी करत असल्याचा प्रताप लोकांच्या निदर्शनास आला व त्यांनी थेट दैनिक मुंबई माणूसचे कार्यालय गाढून बिल्डराने फसवणूक केली अशी कैफियत मांडली.

सरकार एकीकडे सगऴ्यांना हक्काचे घर बांधून देण्यासाठी विविध योजना राबवत आहे, तर दुसरीकडे खासगी बिल्डर्स शासनाच्या जमिनीवरच गैरप्रकारे घरे बांधून कोटयवदीचा मलिदा लाटत आहेत. यामुळे बिल्डर सरकारची फसवणूक करत असून अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी फसवून झालेल्या नागरिकांनी माध्यमांकडे केली आहे. कल्याण पोलिसांनी सांगितलेकी आमच्याकडे तक्रार आली नाही जर तक्रार आली तर आम्ही कारवाई करू.

तर कडक कारवाई करू – जिल्हाधिकारी ( ठाणे )

खासगी विकासक चुकीच्या पध्दतीने व गैरप्रकारे शेतजमिनीवर घरे बांधून विक्रि करत असले तर त्याच्यावर योग्य ती नियमानुसार कारवाई करू. कुणीही नागरिकांची फसवणूक करू नये. अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी मुंबई माणूसशी बोलताना दिली.

जर विकासकांनी बांधकाम केला असेल तर पाडण्यात येईल – कल्याण डोंबिली मनपा आयुक्त

जर सरकारी जमिनिंचा गैरवापर विकासक खासगी व्यवसाया करीता करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. बांधकाम केले असेल तर ते पाडून टाकू. साई बाबा मंदिर,वाडेघर पाडा पाईपलाईन पाणबुड्या नगर, सापाड या भागात पाहणी करून योग्य कारवाई करू. अशी प्रतिक्रिया कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments