ठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

- Advertisement -

tmc, thane mahanagar palika, thane municipal corporation, anniversary

ठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्या हस्ते महापालिकेच्या ध्वजाचे आरोहण झाले. त्यानंतर, अग्निशमन दल, सुरक्षा दल, टीडीआरएफ, एमएसएस यांनी संचलन केले.

ध्वजारोहण व संचलन सोहळ्यानंतर, नरेंद्र बल्लाळ सभागृहात पूजनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त मारुती खोडके, बाळासाहेब चव्हाण, वर्षा दीक्षित, गजानन गोदेपुरे, दिनेश तायडे, अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरिश झळके, उप नगर अभियंता शुभांगी केसवानी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील थोर नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


Web Title: 40th Anniversary of Thane Municipal Corporation celebrated

- Advertisement -