Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणअन् डोंबिवलीजवळ ट्रेनमधून पडून तरूणीचा जीव गेला

अन् डोंबिवलीजवळ ट्रेनमधून पडून तरूणीचा जीव गेला

Charmi Pasad, Dombiwali train accident, train accident, dombiwali, thane, charmi, pasad, girl died ,ठाणे : मुंबईतील लोकलच्या गर्दीनं आणखी एका तरुणीचा बळी घेतला आहे. गर्दीच्या रेट्यामुळं धावत्या ट्रेनमधून पडून तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली-कोपरदरम्यान आज सकाळी ही घटना घडली. चार्मी पासड (वय २२) असं या तरुणीचं नाव आहे.

देसलेपाडा-भोपर येथील रहिवासी आहे. चार्मी पासड या तरुणीने डोंबिवली स्थानकातून आज सकाळी नऊच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून मुंबईच्या दिशेने जाणारी जलद ट्रेन पकडली. डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळेस प्रचंड गर्दी होती. ऑफिसला पोहोचायला उशीर होऊ नये आणि लेटमार्क लागू नये म्हणून तिनं गर्दीतही ट्रेन पकडली. गर्दीमुळं तिला कशीबशी दरवाजाजवळ उभं राहायला जागा मिळाली. तिनं आत शिरण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. ट्रेन कोपरजवळ पोहोचली असता, गर्दीच्या रेट्यामुळं तिचा हात सुटला आणि ती ट्रेनमधून खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणीला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

लोकलमधून पडून मृत्यूचे प्रमाण वाढले…

लोकलमधून पडून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी. कामावर जाण्यासाठी प्रवाशांची धावपळ या सर्व प्रकारामुळे जीवघेणे प्रकार घडत चालले आहेत. त्यामुळे प्रवास करतांना सांभाळून प्रवास करणे गरजेचं आहे. हे प्रकार धांबण्यासाठी काही उपाययोजन होणार की नाही असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments