Friday, March 29, 2024
Homeकोंकणठाणेठाणे : ईव्हीएमवर शाई फेकून, ‘ईव्हीएम मुर्दाबाद’ च्या घोषणा!

ठाणे : ईव्हीएमवर शाई फेकून, ‘ईव्हीएम मुर्दाबाद’ च्या घोषणा!

throw ink on EVM sunil khambe thane
ठाणे : ठाणे येथे आज मतदानाच्या दिवशी एका तरुणाने मतदान केंद्रात प्रवेश केला. ईव्हीएमवर शाई फेकली आणि ईव्हीएम मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुनिल खांबे नावाचा एक तरुण मतदानासाठी मतदान केंद्रावर आला होता. त्यानंतर त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांकडील शाई बॉटल हिसकावत ईव्हीएमवर फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. खांबे यांनी शाई फेकत ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवलं आहे.

मला फासावर लटकवलं तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार, सुनिल खांबे याने घोषणाबाजी केली. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा, असंही आवाहन केलं. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments