Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeकोंकणठाणेवसई विरार महापालिका निवडणूक: वसईत ‘बविआ’सोबत आघाडीसाठी ‘मविआ’ उत्सुक

वसई विरार महापालिका निवडणूक: वसईत ‘बविआ’सोबत आघाडीसाठी ‘मविआ’ उत्सुक

Vasai Virar Municipal Corporation Elections 2021 Maha Vikas Aghadi wishes alliance with Bahujan Vikas Aghadi
Vasai Virar Municipal Corporation Elections 2021 Maha Vikas Aghadi wishes alliance with Bahujan Vikas Aghadi

वसई : वसई विरार महापालिका निवडणुकांच्या  तोंडावर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीसोबत युती करण्यासाठी महाविकास आघाडी इच्छुक असल्याची चर्चा सुरु आहे. युती झाली तरी सत्ताधारी बविआ महाविकास आघाडीला किती जागा देणार, हा प्रश्न निर्माण होईल.

गेल्या महापालिका निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेना, भाजप यांनी बहुजन विकास आघाडीविरोधात मोठी ताकद लावली होती. परंतु तरीही एकहाती सत्ता मिळविण्यात हितेंद्र ठाकूर यांचा बविआ पक्ष यशस्वी झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार, याची उत्सुकता आहे.

बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता

115 नगरसेवकांपैकी तब्बल 107 नगरसेवक हे हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे आहेत. शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत, तर भाजप, मनसे यांचे प्रत्येकी एक-एक नगरसेवक आहेत. एक नगरसेवक अपक्ष निवडून आला आहे. वसई विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांचं अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप, महाविकास आघाडी आणि मनसेनेही आतापासूनच कंबर कसली आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याची अशी चर्चा सुरु आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाचा दाखला देत यंदाच्या निवडणुकीत सर्वच 115 जागा जिंकणार, असा विश्वास बहुजन विकास आघाडीकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपासह रंगत येणार, यात शंका नाही.

वसई विरार महापालिका पक्षीय बलाबल

बविआ – 107

शिवसेना – 05

भाजप – 01

अपक्ष – 01 (मनसे पुरस्कृत)

अपक्ष – 01 (बविआ पुरस्कृत)

काँग्रेस, राष्ट्रवादी – एकही नाही

एकूण नगरसेवक – 115

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments