Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeकोंकणठाणेशॉर्टकर्टच्या नादात रेल्वे रूळ ओलांडतांना तरुणीचा मृत्यू

शॉर्टकर्टच्या नादात रेल्वे रूळ ओलांडतांना तरुणीचा मृत्यू

Pregnant Woman Pushed From Running Mumbai Local Train by Her Husbandकल्याण : रेल्वेस्थानकातून बाहेर पडतांना शॉर्टकर्ट पर्याय तरुणीच्या जीवावर बेतला. रेल्वे रूळ ओलांडतांना लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. अनु दुबे ( वय २३) असे तरुणीचे नाव आहे. ही घटना कल्याण रेल्वेस्थानकावर घडली.

प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणाऱ्या धीम्या लोकलने तरुणीला धडक दिली. या अपघातात अनु दुबे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कानात हेडफोन लावलेला होता अशीही माहिती समोर येत आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला रेल्वेकडून समांतर भिंत बांधण्याचे काम सुरू होते. हे काम अपूर्ण आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी भिंत नसलेल्या वाटेचा पायवाट म्हणून प्रवासी वापर करत होते. वेळ वाचवण्यासाठी दररोज शेकडो प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलंडतात. रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी अनु दुबे या तरुणीच्या मृत्यूची अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments