Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी!

ठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी!

महत्वाचे….
१. घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी
२. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं आपत्ती व्यवस्थापनची धावपळ
३. ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेनं जाणारी एक लेन पूर्णपणे बंद


ठाणे: घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. पाटलीपाडा भागात वाघबीळ पुलाजवळ ऑइल कंटेनर उलटल्याची ही घटना घडली. ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेनं जाणारी एक लेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे बाजूच्या लेनमधून बोरिवलीकडे हळूहळू गाड्या सोडल्या जात आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका बसला.

सदर घटनास्थळी पोलीस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,अग्निशमन दल, IRB चे कर्मचारी, 2 JCB, 2 मातीचे डंपर दाखल झाले आहेत. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचा-याने रस्त्यावर माती टाकण्याचे काम सुरू केले आहे. जेएनपीटीहून सिल्वासाला जात असताना या ऑइल कंटेनरला अपघात झाला. या अपघातात कंटेनरचालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीच्या दिशेनं जाणा-या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन, उलटलेला कंटेनर हटवण्याचं काम करण्यात आल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments