Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रकोपर्डी बलात्कार प्रकरण: माझ्या भवितव्याचा विचार करा, दोषीची याचना

कोपर्डी बलात्कार प्रकरण: माझ्या भवितव्याचा विचार करा, दोषीची याचना

अहमदनगर – कोपर्डी बलात्कार प्रकरणातील तीसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे आणि जितेंद्र शिंदे यांच्या शिक्षेचा युक्तीवाद आज पूर्ण झाला. यावेळी न्यायालयाने भैलुमे याला बोलण्याची संधी दिली असता, माझा भवितव्याचा विचार करुन मला कमी शिक्षा द्या अशी याचना त्याने केली.

नितीनवर लावलेली कलमे ही चुकीची असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी आज न्यायालात केला. भैलुमेचा बचाव करताना त्याच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. नितीन हा सुक्षिशीत असून त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचे ही त्यांनी न्यायालयात सांगितले.  नितीनवर लावण्यात आलेले कटकारस्थान आणि गुन्ह्याला उत्तेजन देण्याचे आरोप हे केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून आहेत. त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावाही नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शिवाय नितीन विरोधात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला नाही हा दावाही त्यांनी न्यायालयात केला. बलात्कार आणि खुनामध्ये तर त्याचा कोणताही संबध नाही. त्याच्या विरोधात कोणताही वैद्यकीय  पुरावा सादर केला गेला नाही. शिवाय तो गरिब घरातील आहे. त्याचे आई वडील त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमि नाही. अशा स्थितीत त्याला कमीत कमी शिक्षा दिली जावी अशी विनंती त्याच्या वकिलांनी न्यायालयात केली. आपल्या भविष्याचा विचार करून कमीत कमी शिक्षा दिली जावी अशी याचना यावेळी नितीनने न्यायाधिशांकडे केली.
तर या प्रकरणातला मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या वकिलांनीही त्याला फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली जावी अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र शिंदे याने एक दिवसाची काय आणि हजार दिवसाची काय शिक्षा ही शिक्षाच आहे असे न्यायालयात सांगितले.
२२ तारखेला आरोपी दोनचा शिक्षेचा युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करतील. निकम जी शिक्षा मागतील त्यावर न्यायालय अंतिम निर्णय घेईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments