सिद्धीविनायकाच्या दर्शनाला लाखो भाविकांची गर्दी

- Advertisement -

मुंबई: आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने मुंबईत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला लाखो भाविकांनी गर्दी केलीय. भाविकांचं दर्शन सुलभ आणि सुरक्षित व्हावं यासाठी सिद्धीविनायक मंदिर न्यासानं विशेष व्यवस्था केली आहे.

लाखो भाविकांची गर्दी असूनही लवकर दर्शन होण्यासाठी रांगेचंही विशेष नियोजन करण्यात आलंय. यावर्षी मेट्रो ३ च्या खोदकामामुळे नर्दुल्ला टँक मैदान भाविकांच्या रांगेचे नियोजन होऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदाचा मंदिर न्यासानं पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या आवारात भाविकांच्या रांगेचं नियोजन केलंय. भाविकांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी काल संध्याकाळ पासूनच रांगा लावल्या आहेत.

अंगारक ऋषींना बाप्पा प्रसन्न झाले तो दिवस म्हणजे अंगारकी चतुर्थीचा दिवस मानल जातो.हा सण अत्यंत पवित्र  आणि महत्त्वाचा सण आहे. म्हणून आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी  होते.

- Advertisement -
- Advertisement -