Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रललिता साळवे प्रकरण: लिंगबदल शस्त्रक्रिया सुनावणीसाठी तारीख पे तारीख

ललिता साळवे प्रकरण: लिंगबदल शस्त्रक्रिया सुनावणीसाठी तारीख पे तारीख

मुंबई : बीड महिला पोलीस कर्मचारी ललिता साळवे हिच्या लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळविण्याच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती खेमकर यांनी ही याचिका न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्याकडे पाठविली असता हे प्रकरण मॅट आणि पोलीस सेवेसंबंधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे, मॅटनध्ये जाण्याचा पर्यायही कोर्टानं दिलाय. या वर ३० नोव्हेंबरला  पुन्हा सुनावणी होणार आहे.

लिंग बदलाच्या मागणीनंतर पोलीस दलातल्या नोकरीवर गदा आल्याने माजलगावच्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे हिने आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतरही आपली पोलीस दलातील नोकरी कायम राहावी, अशी मागणी ललिता साळवे हिने हायकोर्टाच्या याचिकेत केली आहे. दरम्यान, ललिलाच्या विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याला दिल्यात पण यासंबंधीचे लेखी आश्वासन अद्याप मिळालं नसल्याने ललिता साळवेंनी आज अखेर हाय कोर्टात याचिका दाखल केली.

मूळची राजगावची ललिचा साळवे ही पाच वर्षांपूर्वी बीड पोलीस दलात महिला कॉन्स्टेबल म्हणून भरती झालीय. पण तिच्या शरिरात सातत्याने होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे डॉक्टरांनी तिला लिंग बदल शस्त्रक्रियेला सल्ला दिलाय. त्यानुसार तिने रितसर बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याच्या रजेचा अर्ज देखील केला. पण त्यांनी तो अर्ज राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवला पण तिथे ललिता साळवेची मागणी अजब ठरवून तिला लिंगबदलाची परवानगी नाकारण्यात आलीय. समजा तिला लिंग बदल करायचाच असेल तर तिला तिची नोकरी गमवावी लागेल, आणि तिला पुन्हा पुरूष गटासाठीच्या सर्व चाचण्या उतीर्ण करून मगच पोलीस दलात पुन्हा दाखल होता येईल, अशी आडमुठी भूमिका पोलीस महासंचालकांनी घेतलीय. त्यामुळे ललिता साळवे हिच्यासमोर हायकोर्टात जाण्यासमोर पर्यायच उरलेला नाही. मात्र ललिता साळवे हिला न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments