Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रहाहाकार: उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग; ५ जणांचा होरपळून मृत्यू

हाहाकार: उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग; ५ जणांचा होरपळून मृत्यू

uran fire उरण : येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत ५ जण मृत्यू झाला आहे. तर, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन अग्निशमन जवानांचा समावेश असल्याचे समजते. प्लांटमध्ये आणखीही काही लोक अडकून पडल्याची भीती असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळी सातच्या सुमाराला लागलेली आग अजूनही भडकतच आहे. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग लिक्विड गळतीमुळे लागली आहे. आग लागली तेव्हा रात्रीपाळीचे कामगार कामावर होते. आग लागल्यानंतर तिथं मोठा गोंधळ उडाला. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनेक कामगार जखमी झाले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. प्लांटमध्ये नेमके किती कामगार होते, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

या आगीमुळे परिसरात घबराट पसरली असून आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित स्थळी जाऊ लागले आहेत. आगीची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, तसेच द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत आहेत.

गेल्याच महिन्यात या प्लाटमध्ये स्फोट होऊन आग लागली होती. हा प्लांट मोठा आणि जुना असून आतील सामग्रीही जुनी झालेली आहे. यामुळे या प्लांटला गळतीचा धोका नेहमीच राहिलेला आहे. या आगीमुळे पुन्हा एकदा या प्लांटचा, कामगारांचा आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे आसपासच्या नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments