मुंबई मनपामध्ये चतुर्थ श्रेणी पदासाठी महाभरती!

- Advertisement -

महत्वाचे…
१.तब्बल २००९ नंतर होत आहे भर्ती २.ऑनलाईनपध्दतीने होणार भर्ती ३. कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार प्रवर्गांतील १,३८८ रिक्त पदे सरळ सेवेने भरणार


मुंबई: मुंबई महापालिकेत तब्बल आठ वर्षांनी चतुर्थ श्रेणी कामगारांची महाभरती होणार आहे. पालिकेच्या विविध विभागांतील कामगारांची रिक्त होणारी पदे भरण्यासाठी तब्बल १,३८८ जागांसाठी भरती होणार आहे. संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने ही भरती होणार आहे.

पालिकेचे जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण या अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. या विभागात कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार प्रवर्गांतील १,३८८ रिक्त पदे सरळ सेवेने भरली जाणार आहे.

- Advertisement -

पालिकेत यापूर्वी सन २००९मध्ये शेवटची कामगारांची पदे भरली गेली होती.

 १,३८८कर्मचाऱ्यांची भरती

– सर्व पदं चतुर्थ श्रेणीत

– संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन

– जल, आरोग्य, रुग्णालयं, मलनिःसारण विभागांमध्ये भरती

– कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार

- Advertisement -