Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeविदर्भअकोलातीन वाहनांच्या विचित्र अपघात, चौघे ठार!

तीन वाहनांच्या विचित्र अपघात, चौघे ठार!

Road Accident, Malegaon

महत्वाचे

  • अकोला राज्य महामार्गावर दोन ट्रक व लक्झरी बसचा रिधोराजवळ भीषण अपघात
  • चार ठार, २१ जखमींवर अकोल्यातील सामान्य रुग्णालयात उपचार
  • सोमवारी मे रोजी पहाटे वाजेच्या सुमारास घडली दुर्घटना

मालेगाव : अकोला राज्य महामार्गावर दोन ट्रक व लक्झरी बसचा रिधोराजवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात चौघे ठार झाले. २१ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना अकोला, वाशिम येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींवर मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन अकोल्यातील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले. सोमवारी मे रोजी पहाटे वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  

लक्झरी बस (क्रमांक ०२-६००१) अकोल्याकडे जात असताना समोरुन येणाऱ्या आयशर (क्रमांक ६८ जी . ०१६८) कारची समोरासमोर धडक बसली. यावेळी रस्त्याच्या बाजूनं उभा असणाऱ्या ट्रकवर (क्रमांक आर.जे. २६ जी .ए. ३६०९) दोन्ही वाहने आदळली. या अपघातात आयशर चालक व लक्झरीमधील दिलीप नारायण जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही.

जखमीं प्रवाशी….
शैलेंद्र हुकूमसिंग (वय ३० वर्ष, अमरावती),गिरीप्रसाद गोपालकृष्ण ( वय ३० वर्ष ),उज्ज्वल सुदाम भगत ( वय १८ वर्ष ),श्रीजेश ( वय ३२ वर्ष, नागपूर),नवीन पांडुरंग शिंदे ( वर्ष २७ वर्ष, विक्रोळी मुंबई),नीलेश ज्ञानदेव बढे (डोंबिवली), उपनित कौर, अमरजीत कौर ( वय २८ वर्ष, मुंबई ),
गुरमितसिंग गोत्रा ( वय २६ वर्ष, नागपूर),  शैलेंद्र कुमार झा ( वय ४९ वर्ष,अहमदाबाद )
आनंद यादव (वय ३५ वर्ष, बिदर मुंबई), अण्णा उधार कदम (वय २१ वर्ष ) अंबेजोगाई

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments