Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर करण्याची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर करण्याची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

"मराठा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी गावात झाला. अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतला जाईल, असा मला विश्वास आहे," असे पडळकर यांनी सांगितले.

BIP MLC Gopichand Padalkar Demands to changing name of Ahmadnagar महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यास सरकारने मंजुरी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सोमवारी अहमदनगरचे अहिल्या नगर असे नामकरण करण्याची मागणी केली.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हि मागणी केली आणि ते म्हणाले, “अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्या नगर करण्यात यावे. सर्वांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलले. त्यानंतर अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर करण्याची मागणी लोक करत आहेत.”

“मराठा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी गावात झाला. अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतला जाईल, असा मला विश्वास आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.

“औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात होणारच. @BJP4Maharashtra @mieknathshinde,” असे ट्विट त्यांनी मराठीत केले.

यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण करण्यास मान्यता दिली होती. गृह मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रातील दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्यास “आक्षेप नाही” असे सांगितले.

Web Title: Maharashtra BJP leader Gopichand Padalkar demands renaming of Ahmednagar as Ahilya Nagar

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments