
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात येणाऱ्या या अर्थसंकल्पात 15 मोठ्या घोषणा केल्या. यात महिलांपासून शाळकरी मुली आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा आहेत. याशिवाय काही विकास प्रकल्पांचीही घोषणा करण्यात आली.
राज्याच्या अर्थसंकल्पातील 15 मोठ्या घोषणा
- शाळकरी मुलींना बसने मोफत प्रवास
- घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत
- 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने
- मद्यावरील (दारु) व्हॅटमध्ये 60 वरुन 65 टक्के वाढ
- उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार
- पुण्यात रिंग रोडची घोषणा, 24 हजार कोटींचा निधी
- आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटींचा प्रकल्प
- पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार
- मुंबईतली कोस्टल मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करणार
- राज्यातील प्राचीन मंदिरांचे 8 प्राचीन मंदिरांचे जतन करणार
- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या खर्चासाठी यंदा 400 कोटी
- नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार
- पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देणार
- सारथी, बार्टी संस्थांना प्रत्येकी 150 कोटी रुपयांची तरतूद
- शासकीय रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणार
पुरोगामी महाराष्ट्रात फसव्या विज्ञानाचा प्रचार रोखणार
सध्याच्या काळात देशात जाणीवपूर्वक फसव्या विज्ञानाचा प्रचार होत आहे. हा छद्म विज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क उभारण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra budget 2021 ) करण्यात आली. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. सध्या देशात फसव्या विज्ञानाचा जाणीवपूर्वक प्रचार होत आहे.
अशा परिस्थितीत भावी पिढीच्या मनात अभिजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक महसूल मुख्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक अशा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्कची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबईतील नेहरू सेंटरच्या नुतनीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, अजित पवारांची मोठी घोषणा
महिला दिनाच्या दिवशी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. यापैकी गृहलक्ष्मी या योजनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या योजनेनुसार राज्यात कोणतेही घर विकत घेतले जाईल तेव्हा त्या घराची नोंदणी महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाईल. 1 एप्रिल 2021 पासून या योजनेची अंमलबजावणी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार
- शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प 2022 ला पूर्ण करणार
- वरळी ते शिवडी पूलाचे काम 3 वर्षात पूर्ण करणार
- मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार
- वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार
- कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार
- मुंबईतील 14 मेट्रोलाईनचे 1 लाख 40 हजार कोटी खर्च अपेक्षित
- मेट्रो मार्ग 2 अ, 7 चे काम 2021 पर्यंत पूर्ण करणार
- मुंबईतील कोस्टल मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करणार
- मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार