Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात 6,185 कोरोना रुग्ण सापडले, 85 रुग्णांचा मृत्यू

राज्यात 6,185 कोरोना रुग्ण सापडले, 85 रुग्णांचा मृत्यू

मुंबई l महाराष्ट्रात आज शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे Covid19 Cases 6,185 नवीन रुग्ण आढळले. 85 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 4,089 रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारतर्फे खबरदारी घेतली जात आहे.

वाचा l तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक आहे;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

 राज्यात आजपर्यंत एकूण 16,72,627 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण Recovery Rate 92.48 % एवढे झाले आहे. आज राज्यात 6,185 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 85 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

वाचा l भाजपा कार्यकर्त्यांना गाजर दाखवत आहे;अजित पवारांनी साधला निशाणा

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.59% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,06,35,600 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,08,550 (17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,28,395 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचा l भारती सिंह ड्रग्ज केसवरुन राखीचा सवाल, पाहा VIDEO…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments