Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown l महाराष्ट्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन कायम

Lockdown l महाराष्ट्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन कायम

मुंबई l कोरानाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाउन Maharshtra lockdown आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भातला आदेश महाविकास आघाडी सरकारने काढला आहे.

राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाउन असणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर करोनाचा संसर्ग वाढतो आहे असं लक्षात आलं.

वाचा l राज्यात 6,185 कोरोना रुग्ण सापडले, 85 रुग्णांचा मृत्यू

मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून करोना संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

खरंतर देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाउन लागू करायचा असेल तर त्यासाठी आता केंद्र सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे. यासंदर्भातली सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारीच दिली होती. केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाउन करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घेणं आवश्यक आहे. करोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

वाचा l Vivo Y1s भारतात लाँच, किंमत फक्त 7,990 रुपये

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भातला आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाउन असणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे असं लक्षात आलं. मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून करोना संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

खरंतर देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाउन लागू करायचा असेल तर त्यासाठी आता केंद्र सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे. यासंदर्भातली सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारीच दिली होती. केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाउन करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घेणं आवश्यक आहे. कोरोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments