Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींच्या सभांचा मुंबईत तर पंतप्रधान मोदींचा जळगाव,भंडा-यात धडाका

राहुल गांधींच्या सभांचा मुंबईत तर पंतप्रधान मोदींचा जळगाव,भंडा-यात धडाका

rahul gandhi narendra modi maharashtra assembly election 2019
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारचा मुहूर्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगावा,भंडारा येथे सभा होणार आहे. तर राहुल गांधी यांच्या मुंबईमध्ये दोन तर लातूरच्या औश्यात एक सभा होणार आहे.

या दोन बड्या नेत्यांच्या प्रचार झंझावताने रविवार ढवळून निघणार आहे. राहुल गांधी यांची रविवारची पहिली सभा लातूर येथील औसा येथे दुपारी २.१५ वाजता होणार आहे. त्यानंतर ते मुंबईत दाखल होणार असून मुंबईत दोन सभा घेणार आहेत. मुंबईत संध्याकाळी ५ वाजता चांदिवली येथे तर दुसरी सभा धारावी येथे संध्याकाळी ६.३० वाजता घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे लागले आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांची ही पहिलीच सभा असून ती जळगाव येथील कुसुंबा येथे दुपारी १२ वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता भंडारा येथील साकोली येथे मोदींची दुसरी सभा होणार असल्याचे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले आहे. या सभांमधून भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच रविवारी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या देखील तीन ठिकाणी सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत असल्याने ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच महाआघाडीने संयुक्तरित्या जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्या अनुषंगाने राहुल गांधी कोणत्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments