Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रcoronavirus updates l महाराष्ट्रात कोरोनाचे ४ हजार रुग्ण सापडले, ३० रुग्णांचा मृत्यू

coronavirus updates l महाराष्ट्रात कोरोनाचे ४ हजार रुग्ण सापडले, ३० रुग्णांचा मृत्यू

मुंबई l  देशात पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. महाराष्ट्रात मागील चोवीस तासात ४ हजार १५३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. Maharashtra-covid-cases मागील चोवीस तासांमध्ये ३० रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

१ कोटी २ लाख ८१ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण १७ लाख ८४ हजार ३६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासांमध्ये ३० रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा l कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर; ‘या’ चार राज्यांकडून सर्वोच्च न्यायालयानं मागवला अहवाल

मागील चोवीस तासात ३ हजार ७२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.७४ टक्के इतका झाला आहे.

 हेही वाचा l महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड टेस्ट सक्तीची

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments