Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र बंद अपडेट

महाराष्ट्र बंद अपडेट

2.15 – दहिसर टोल नाक्यावर वाहनं रोखून धरणाऱ्या आंदोलकांनी आता टोल नाकाही बंद पाडला…
12.09 – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अडवला… उर्से टोलनाका येथे आंदोलक रस्त्यावर…
12.05 – सायन-पनवेल हायवेजवळ एसटी बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढलं जातंय… टू-व्हीलर्सनाही पुढे जाण्यास मज्जाव…
11.55 – घाटकोपर, विक्रोळी स्टेशनात आंदोलकांचा रेल रोको… मध्य रेल्वेची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद…
11.48 – गोवंडी, जुईनगर येथे रेल रोको… हार्बर रेल्वे वाहतूकही विस्कळीत…
11.45 – मुंबई मेट्रोच्या ट्रॅकवरही उतरले आंदोलक… घाटकोपर ते एअरपोर्ट रोड सेवा काही काळासाठी बंद…

11.38 – सोलापूर: माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांना कार्यकर्त्यांसह अटक
11.34 – सांताक्रूझच्या वाकोला भागात आंदोलकांचा रास्ता रोको
11.30 – मुंबई विद्यापीठाची आजची परीक्षा आजच… विद्यार्थ्यांना एक तास उशीर झाला तरी परीक्षा देता येणार… तासभर उशिराने आलेल्या विद्यार्थ्यांना तेवढा वेळ वाढवून देणार…

11.25- ​ नागपूर: इंदोरा, नारा, जाटतरोडी, रामेश्वरी भागात तणावपूर्ण शांतता; संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त
11.20 – ​ मुंबई: कलानगर जंक्शनमध्ये आंदोलकांचा रास्ता रोको
11.17 – मुंबईत सकाळपासून आत्तापर्यंत १३ बसेसची तोडफोड
11.10 – बदलापूरः आंदोलकांना हटवताना राजश्री नवले या महिला पोलिसाशी कार्यकर्त्यांची झटापट, नवले यांच्या हाताला मार लागल्यानं चौघांना अटक… कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी करत कार्यकर्त्यांचा गोंधळ… पोलिसांचा लाठीमार…
11.01 – पुणेः दांडेकर पूल चौकात ठिय्या आंदोलन, वाहतूक बंद पाडली…
10.58 – ओला-उबर चालकांचा लांबच्या फेऱ्यांना नकार, ठिकठिकाणी आंदोलनं सुरू असल्यानं सावध पवित्रा…
10.45 – ​ पश्चिम रेल्वेवर नाला सोपारा स्टेशनात आंदोलक मोठ्या संख्येनं ट्रॅकवर उतरले… पोलीस आणि

प्रशासनाकडून त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न…
10.40 – अंबरनाथ रेल्वे स्टेशनातही रेल रोको… जमावाला पांगवण्यासाठी पोलीस सज्ज…
10.30 – नागपूर दक्षिण भागातील त्रिसरन चौकात बसवर दगडफेक, टायर जाळले…
10.20 – पुणेः सिंहगड रोड परिसरात पीएमटी बसवर दगडफेक
10.10 – ​ अहमदनगरः तारकपूर बसस्थानकातून सकाळपासून एकही बस सुटली नाही, प्रवासीही तुरळक…
10.00 – विरार स्टेशनात सकाळी साडेआठ वाजता दहा मिनिटांसाठी रेल रोको झाला…
9.58 – ​ लोणावळ्यात कडकडीत बंद… दुकानं, हॉटेल्स न उघडल्यानं पर्यटकांचे हाल…
9.53 – कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात एसटीच्या वाहतुकीवर ‘बंद’चा परिणाम नाही…
9.48 – ​ पुणे, नाशिक, नागपूरमध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू…
9.40 – विरार आणि गोरेगावमध्ये ट्रॅकवर उतरलेल्या आंदोलकांना हटवलं… ९.०५ पासून वाहतूक सुरू…
9.30 – औरंगाबादः दौलताबाद येथील देवगिरी शाळेसमोर अज्ञात व्यक्तींची सहलीच्या बसवर दगडफेक… एक विद्यार्थ

आणि एक शिक्षक जखमी
9.22 – मरीन लाइन्स येथे खाजगी गाडीवर दगडफेक
9. 20 – ​ चेंबूर परिसरात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना घरी सोडले… अनेक शाळांनी कालच जाहीर केली होती सुटी…
9.10 – ​ पुणे-सातारा विना वाहक आणि पुणे-बारामती एसटी बसेस बंद
9.00 – ​ विरार स्टेशनात आंदोलकांनी लोकल अडवली… पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम…
8.53 – ​ मुंबईत बेस्ट बसेसची वाहतूक सुरळीत सुरू…
8.50 – मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद… सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय…
8.43 – औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आजचे पेपर पुढे ढकलले…
8.40 – ​ रत्नागिरीः गुहागरमध्येही एसटी सेवा ठप्प… सर्व एसटी स्टँडवरच थांबवल्या…
8.38 – ठाण्यातील सर्व शाळांना सु्टटी… एकही स्कूल बस रस्त्यावर नाही…
8.35 – ठाणेः पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं… मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; पण सुरू…
8.30 – ​ ठाण्यात तीन हात नाक्यावर जमाव… वाहतूक रोखली…
8.20 – ठाण्यात सकाळी पावणेआठच्या सुमारास आंदोलकांनी ‘रेल रोको’ केला…
8.15 – ठाण्यात आंदोलकांनी टीएमटी आणि रिक्षा वाहतूक रोखली… जमावबंदीचे आदेश…
8.10 – ठाण्यातील निळकंठ टॉवर येथे टीएमटी बसवर दगडफेक… हल्लेखोर बाईकवरून पळाले…
8.05 – ​ औरंगाबादमध्ये एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद… अफवा पसरू नयेत यादृष्टीने इंटरनेट सेवाही बंद…
8.00 – चेंबूरमध्ये खासगी शाळेच्या बसवर दगडफेक… आंदोलकांकडून बसची तोडफोड… कुणीही जखमी नाही…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments