Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

मुंबई: राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत होईल याचे संकेत दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे.  तसेच दहावीच्या बोर्डाची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधी घेण्यात येईल. तसेच या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे.  सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. लॉकडाऊन काळातही ऑनलाईन वर्ग सुरु होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments