Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; एनआयए, मुंबई पोलिसांची संयुक्त चौकशी सुरू

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; एनआयए, मुंबई पोलिसांची संयुक्त चौकशी सुरू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने मुंबई पोलिसांना या घडामोडीची माहिती दिली, त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

Mumbai Police NIA
Representative image

तालिबानी सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा मेल राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) प्राप्त झाला आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी शुक्रवारी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने मुंबई पोलिसांना या घडामोडीची माहिती दिली, त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

“धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला तालिबानी असल्याचे सांगितले. त्याने मुंबईत दहशतवादी हल्ला होणार असल्याचे सांगितले,” असे मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले. धमकीचा मेल मिळाल्यानंतर एनआयए आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त तपास सुरू केला.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धमकीचा फोन आला होता ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या लँडलाईनवर दुपारी साडेचार वाजता फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता.

शहरातील विविध भागात बॉम्ब ठेवल्याची माहिती देणारा असाच एका अनोळखी कॉलरचा ‘संशयास्पद’ कॉल मुंबई पोलिसांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आला होता. ज्यात त्याने माहिती दिली होती की शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलरकडून शहरात अंधेरी येथील इन्फिनिटी मॉल , जुहू येथील पीव्हीआर मॉल आणि सहारा हॉटेल विमानतळावर तीन बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.. मुंबई पोलिसांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. अज्ञात फोन करणाऱ्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Web Title: Mail threatening terror attack in Mumbai received; NIA, police initiate joint probe

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments