Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्‍ट्रमामाच्या गावी जाणाऱ्या तरुणीवर आठ दिवस बलात्कार

मामाच्या गावी जाणाऱ्या तरुणीवर आठ दिवस बलात्कार

नंदुरबार: मामाच्या गावाला पायी जात असलेल्या तरुणीला एकटे गाठून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या गेंदामाळ, ता.धडगाव येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तरुणीला युवकाने आठ दिवस दुसऱ्या गावी देखील घेवून जावून अत्याचार केले.

धडगाव तालुक्यातील माळ (गेंदा), ता.धडगाव येथील १९ वर्षीय तरुणी ३ एप्रिल रोजी दुपारी पायवाटेने साव:यादिगर येथील मामाच्या गावाला जात होती. त्यावेळी भुषा ते बिलगाव रस्त्यावर गावातीलच भरत मोचडा पावरा या युवकाने गाठले. तिला जबरीने या रस्त्यावरील पुलाखाली घेवून जावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला दमदाटी करून तो धनाजे, ता.धडगाव व ब्राम्हणपुरी, ता.शहादा येथे घेवून गेला. तेथे देखील त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला असता ती ब्राम्हणपुरी येथे आढळली. त्यानंतर तरुणीसह नातेवाकांनी १४ एप्रिल रोजी धडगाव पोलीस ठाणे गाठले. तेथे तरुणीने फिर्याद दिल्याने भरत मोचडा पावरा याच्याविरुद्ध बलात्कार व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार ए.सी.मोरे करीत आहे. संशयीत आरोपी तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments