Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा क्रांती मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार

मराठा क्रांती मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार

मुंबई: मराठा आंदोलन काळात राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवर दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांसह सरसकट सर्वच गुन्हे मागे घ्यावेत

marathamorcha
Image: mumbailive

मुंबई: मराठा आंदोलन काळात राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवर दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांसह सरसकट सर्वच गुन्हे मागे घ्यावेत, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने,  आज सकाळी ११ वाजता मुंंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय असा पुन्हा निर्वाणीचा मोर्चा काढण्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला.

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे आणि दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर भादंवि ३०७ आणि ३५३ (सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे) या कलमांसह सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तरीही मंत्रालयीन अधिकाऱ्यांमुळे हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. सामान्य विभागाच्या या अधिकाºयांवर निलंबनाच्या कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. आज सकाळी ११ वा. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. आंदोलकर्त्यांना अडविल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या काय आहेत प्रलंबित मागण्या

  • आंदोलन काळातील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे.
  • 2014 च्या विद्यार्त्याना तत्काळ नियुक्त्या द्या.
  • 72 हजार मेगा भरतीतील विद्यार्त्याना तत्काळ नियुक्त्या द्या.
  • एमपीएससीच्या विद्यार्त्यांना तत्काळ नियुक्त्या द्या.
  • सारथी प्रशिक्षण स्वस्था मराठ्यांसाठी समिती द्या.
  • आबा पाटील महामंडलानच्या सुलभ कर्ज योजना तत्काळ करा.
  • शेतकऱ्यांना पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments