Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

सुप्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

Jairam Kulkarni diesपुणे : आपल्या अभिनयानं मराठी सिनेसृष्टी गाजवलेले सुप्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी आज पहाटे त्यांची शेवटचा श्वास घेतला. आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयराम कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती.

जयराम कुलकर्णी यांचा थोडक्यात परिचय

जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव. 17 ऑक्टोबर 1932 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती. कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी त्यांची मैत्री झाली. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका त्यांना साकारायला मिळाली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच. जयराम कुलकर्णी असा शिक्का त्यांच्यावर बसला.

कॉलेज शिक्षणानंतर 1965 साली आकाशवाणी पुणे केंद्रात त्यांना नोकरी लागली. नाटकात कामे करण्याची हौस असल्याने १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरीला त्यांनी रामराम ठोकावा लागला. आकाशवाणीत नोकरी करत असताना ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी त्यांचा संबंध आला व अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली. याचाच फायदा चित्रपटात काम करताना त्यांना झाला.

सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका त्यांनी चित्रपटांतून केल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या गाजल्या. जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी डॉ हेमा कुलकर्णी आहेत, तर त्यांचा मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. मृणाल देव- कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments