Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रगोंधळ: मराठी अभिमान गीत सुरू असतानाच ध्वनीक्षेपक बंद!

गोंधळ: मराठी अभिमान गीत सुरू असतानाच ध्वनीक्षेपक बंद!

मुंबई: मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात मराठी अभिमान गीत सुरू असतानाच ध्वनीक्षेपक अचानक बंद पडला. त्यामुळे गीत गात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंढे, अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्वजण गोंधळात पडले. यामुळे पुन्हा सरकार मराठी विरोधी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

विधान मंडळाच्या समोर आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी अभिमान गीत गाण्यात आले. मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या चमूने गीत गायनाला सुरुवात केली. मराठी अभिमान गीत सुरू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्री, आमदार आणि उपस्थित सर्वजण गीत गात होते.
गीत गायन सुरू असतानाच ध्वनी क्षेपक बंद पडले. यावेळी अचानक सीडी वरील गीत लावण्यात आले. सिडीवरील गाणे सुरू झाले आणि पुन्हा एकदा गोंधळ उडाला. नेमके गीत गायचे कुठून अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व प्रकारानंतर विरोधकांनी मात्र आक्रमक भूमिका घेत सरकारच्या या गलथान कारभाराचा निषेध केला. राज्यपालांच्या अभिभाषणा वेळी मराठी भाषांतराचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर सरकारला माफी देखील मागावी लागली होती. हे सर्व प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा हा गोंधळ झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments