Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबाद मनपा आयुक्त दीपक मुगळीकर कचऱ्यातून बाहेर!

औरंगाबाद मनपा आयुक्त दीपक मुगळीकर कचऱ्यातून बाहेर!

aurangabad, dipak औरंगाबाद –  औरंगाबाद मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये पेटलेला कचरा प्रश्नातून बाहेर काढण्यासाठी मुगळीकर यांनी बदलीसाठी प्रयत्न केले होते. मुगळीकर यांनी आपले वजन वापरुन कचऱ्यातून स्वत:ची सुटका करुन घेतली. अशी चर्चा मनपा वर्तुळात सुरु झाली आहे. यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पालिकेचा अतिरिक्त पदभार सोपावण्यात आले आहे.

गेल्या २६ दिवसापासून नारेगाव मधील कचरा प्रकरण राज्यात गाजत आहेत. औरंगाबाद शहराची कचऱ्यामुळे कचराकुंडी बनली आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचले आहे. कचऱ्याचा प्रश्न विधानसभेतही पेटला. कचऱा डेपाला विरोध करणाऱ्या मिटमिटा येथील नागरिकांना पोलिसांनी अमानुष पणे मारहाण केल्यामुळे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. तर तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. आता मुगळीकरांनी स्वत:ची बदली करुन घेतली. मात्र शहरातील कचऱ्याची समस्या कायम असून राजकीय मंडळींना काही देणे घेणे नाही अशी स्थिती सध्या झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments