Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबाद विमानतळ नव्हे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ!

औरंगाबाद विमानतळ नव्हे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ!

Aurangabad Airportऔरंगाबाद : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्यात आले आहे. आज गुरुवार (५ मार्च) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतची घोषणा विधानसभेत केली.

विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “ धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले होते. तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराला संभाजीनगर असे नाव द्या अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती. त्यापूर्वी औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments