Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादभाजपचे हिंदुत्व मनुवादी; शिवसेनेचे धर्मनिरपेक्ष : प्रा. जोगेंद्र कवाडे

भाजपचे हिंदुत्व मनुवादी; शिवसेनेचे धर्मनिरपेक्ष : प्रा. जोगेंद्र कवाडे

Jogendra kawadeऔरंगाबाद : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्रं सोडलं. भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी असून शिवसेनेचे हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष असल्याचे मत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रा. कवाडे औरंगाबाद येथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार, मंत्रीपद आणि ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचा नेता छत्रपती शिवरायांचा अपमान करतो त्याबाबत भाजपा गप्प राहते. त्या नेत्यावर कोँणतीही कारवाई होत नाही. तो पुस्तकही माघारी घेत नाही. त्यामुळे भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. असं प्रा. कवाडे म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत घरोबा करुन सरकार स्थापन केलं याबाबत प्रा. कवाडे म्हणाले की, भाजपच हिंदुत्व मनुवादी असून मनुवादी हिंदुत्व हे समानता, धर्मनिरपेक्षता हे मूल्यं नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, शिवसेनेचे हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा शिवसेनेकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळात स्थान मिळेल आशा जिवंत आहे…

मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, याबाबत प्रा. कवाडे यांनी हे आघाडीचे सरकार आहे. मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वाटा मिळेल, अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण न झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. पुढे विस्तार होईल, आशा जिवंत आहे, असे सुचक विधानही त्यांनी केले.

शरद पवार शेतकऱ्यांच जाणता राजा

शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर कसं चालतं? असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता प्रा. कवाडे यांनी थेट उत्तर न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणतात, असे नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments