Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबादमध्ये वसाहतीत शिरलेला बिबट्या अखेर पिंज-यात

औरंगाबादमध्ये वसाहतीत शिरलेला बिबट्या अखेर पिंज-यात

Leopard in aurangabad,aurangabad,leopard
Image : The Hindu

औरंगाबादच्या सिडको भागात आज मंगळवारी सकाळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. आठ तासाच्या प्रयत्नानंतर त्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले.

सिडकोतील एन 1 भागात असलेल्या काळा गणपती मंदिरामागील वॉकिंग ट्रॅक भागात स्थानिकांना सकाळी 6 वाजेच्या सुमारास बिबट्या दिसला त्यानंतर काही स्थानिक लोकांनी त्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेरॅत टिपले. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या बिबट्याचा शोध सुरु केला. हा बिबट्या एका घरातच लपून बसल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हेरले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या हालचाली सुरु केल्या.

दरम्यान, ज्या घराजवळ हा बिबट्या दिसून आला होता त्या घराच्या एका खोलीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चहुबाजूने जाळी लावली होती, याच खोलीत तो होता. त्यानंतर योग्य वेळ साधत बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन टोचण्यात आले आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याला जेरबंद केले. त्यानंतर एका पिंजऱ्यातून वनविभागाचे कर्मचारी त्याला घेऊन गेले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, तो हाती लागत नसल्याने कर्मचाऱ्यांचीही चिंता वाढली होती. अखेर आठ तासांच्या प्रयत्नांनतर त्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. भरवस्तीत बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments