Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादशेवटी सरकार कोणासाठी बनवायचं : उध्दव ठाकरे

शेवटी सरकार कोणासाठी बनवायचं : उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray During a Drought review tour at Aurangabad
औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आज औरंगाबाद जिल्ह्यात केली. शेतक-यांनो आत्महत्या करु नका. मी नेता नाही, कुटुंब म्हणून आलो. तिकडे सरकार बनवण्याच्या धावपळी सुरु असतील परंतु , शेवटी सरकार कुणासाठी बनवायचं असा सवालही उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला.

उध्दव ठाकरेंनी नुकसानग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तुमच्या आशिर्वादाने आपलं सरकार आलं की सातबारा कोर करणार आहे. नेते मोठे होतात आणि तुम्हाला विसरतात. परंतु तुम्ही शेतकरी अण्णदाते आहात, तुम्ही जगणं महत्वाचं आहे. तुम्ही जगलो की आम्ही जगणार. तुमच्या जिवावर आम्ही मजा मारतो. असंही उध्दव ठाकरे म्हणाले. शेतक-यांशी संवाद साधतांना म्हणाले.

कन्नड आणि वैजापूर तालुक्यातील शेतींची उध्दव ठाकरेंनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, आमदार अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुरेश धस यांच्यासह शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार, नेते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments