Thursday, March 28, 2024
HomeमराठवाडाबीडMaharashtra Vidhan Sabha : परळीत ओनली 'डीम', नो 'पीएम'!

Maharashtra Vidhan Sabha : परळीत ओनली ‘डीम’, नो ‘पीएम’!

pankaja munde dhananjay munde togheterपरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी चुलत बहिण भाजपच्या पंकजा मुंडे यांचा जोरदार पराभव केला. परळीकरांनी धनंजय मुंडे म्हणजे ओनली डिम, तर नो पीएम म्हणजे पंकजा मुंडे यांना नाकारले. याच नावाने मतदारसंघात दोघांचा उल्लेख केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह यांनी पंकजा मुंडेच्या विजयासाठी सभा घेतल्या होत्या. तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धनंजय मुंडेच्या भाषणाच्या क्लिपमध्ये छेडछाड करुन व्हायर करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती. हा ड्रामा खूपच गाजला होता. धनंजय मुंडेंचे पत्रकार परिषदमध्ये खोट्या आरोपामुळे अश्रू अनावर झाले होते. खोटे आरोप फेटाळले होते. बहिण भावाच्या नात्यात कुणीतरी बाहेरचा आताच आलेला भाऊ विष कालवतो असे सांगितले होते.
परळीच्या जनतेने ्अखेर भाजपच्या भावनिक राजकारण नाकारून धनंजय मुंडेंना कौल दिला. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments