Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमराठवाडाबीडचंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची बंद दाराआड मनधरणी

चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची बंद दाराआड मनधरणी

bjp pankaja munde gopinath gad beed parliपरळी : भाजपवर नाराज माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची बंददाराआड अर्धा तास मनधरणी केली. मात्र, पंकजा मुंडे पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. परळी येथे भगवान गडावर स्वाभिमान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बरेचं नेते परळी येथे पोहोचले आहेत. पंकजा मुंडे या भाजप सोडणार अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे भाजपमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पंकजा मुंडे यांनी भूकंपाचा धक्का बसणार असं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडेंची समजूत काढण्यासाठी पाठविण्यात आलं आहे.
पंकजा मुंडेंच्या बंगल्यावर एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक नेते उपस्थितीत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments