Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमराठवाडाबीडशिवसेना उमेदवार जयदत्त क्षीरसागरांचे बोगस मतदार पकडले

शिवसेना उमेदवार जयदत्त क्षीरसागरांचे बोगस मतदार पकडले

बीड : शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या बोगस मतदारांना  मतदान केंद्रावर पकडण्यात आले. हे बोगस मतदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी पकडले. बोगस मतदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यामुळे बीडमध्ये गोंधळ उडाला आहे.
बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर काका पुतण्यामध्ये फाईट होत आहे. दोन दिवसांपूर्वीच जयदत्त क्षीरसागर यांचे पैसे वाटप करताना दोन कार्यकर्ते पकडण्यात आले होते. आज 20 ते 25 बोगस मतदारांना पकडण्यात आले. जयदत्त क्षीरसागर यांच्या बोलण्यावरून मतदानासाठी आम्ही आलो होतो, अशी ग्वाही मतदारांनी माध्यमांसमोर दिली. बोगस मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी बोगस मतदारांविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आज पकडण्यात आलेले बोगस मतदार याचीही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments