Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमराठवाडाबीडतुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार आहात : धनंजय मुंडे

तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार आहात : धनंजय मुंडे

Dhananjay Munde
परळी मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील परळीकरांना तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार असल्याचे ट्विटद्वारे म्हटले आहे. आपल्या विजयाची खात्री दर्शवली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजली आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व भाजापाच्या मंत्री आमदार पंकजा मुंडे या बहिण-भावात थेट लढत झाली आहे.  शेवटच्या दिवसापर्यंत धनंजय मुंडेच्या एका भाषणाच्या क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आली. त्यावरून राजकारण तापवून विषय तक्रारीपर्यंत गेला. आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे या मतदारसंघाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

 धनंजय मुंडेंचा संदेश…

मतदानानंतर धनंजय मुंडे यांनी परळीकरांसाठी ट्विटरच्या माध्यामातून एक खास संदेश दिला आहे. “लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्याबद्दल माझ्या तमाम परळीकरांचे आभार! तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार आहात याची हमी मी तुम्हाला देतो!” असे धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

याद्वारे त्यांनी यंदाच्या निवडणुकीत आपलाच विजय निश्चित आहे, असाच एकप्रकारे संदेश दिला असल्याचे दिसत आहे. शिवाय मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारराजाचे त्यांनी आभारही मानले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments