Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडाभाजपच्या माजी मंत्र्याची पोलीस अधिका-यांना धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

भाजपच्या माजी मंत्र्याची पोलीस अधिका-यांना धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

जालना : भारतीय जनता पार्टीचे BJP माजी कॅबिनेट मंत्री तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर Babanrao Lonikar यांनी परतूरचे पोलीस निरीक्षक आणि आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून धमकावल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. बबनराव लोणीकर यांनी ‘आमचे शंभर आमदार MLA आहे, उद्या विधानसभेत उलटा टांगेन’, अशा शब्दांत त्यांनी धमकी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

परतूर येथील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी हसन गौहर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांनी शहरातील अवैध दारूचे अड्डे, मटका आणि गुटखा साठवणूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मोंढा भागात गोविंद मोर नावाच्या व्यापाऱ्यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता. पो

लिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली होती. परंतु, ज्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकायचा होता, त्याच्या घराऐवजी मोर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. पोलिसांनी आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल तातडीने त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

वादग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, बबनराव लोणीकर यांनी पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांना फोन करून झापले असल्याचे देखील या ऑडीओ क्लीप मधून स्पष्टपणे ऐकू येत आहे. परतूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे व परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी हसन गौहर यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या वादग्रस्त संभाषणाची कॉल रिकॉर्डिंग क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

काय म्हणाले आहेत बबनराव लोणीकर?

दरम्यान बबनराव लोणीकर यांनी सुरुवातीला पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांना फोन करून, ‘मला परतूरच्या दहा पंधरा व्यापाऱ्यांचे फोन आले आहे. ओमप्रकाश यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. शहरात खुलेआम दारू, मटका आणि दोन नंबरचे धंदे सुरू आहे. तुमच्या साहेबाला, काही अक्कल नाही का? तो बिचारा प्रामाणिक माणूस आहे. कोर्टाचा आदेश नसताना लोकांच्या घरात घुसता कसं काय?

वाचा l  ‘कुली नं. १’ गोविंदा की वरुण?पाहा ट्रेलर

 तो साधा गुटखा सुद्धा खात नाही. एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरावर धाड टाकताय, सापडलं का काही? साहेब आयपीएस अधिकारी आहे, त्याला काही बुद्धी आहे की नाही? तुम्ही काय रझाकारी लावली आहे का? विधानसभेत उलटा टांगेन तुम्हा सगळ्यांना, आयपीएस अधिकारी झाला म्हणून लय मोठा झाला आहे का? विधानसभेत १००आमदार आहे, सस्पेंड करण्याची मागणी करतील, त्याला एसपी व्हायचं आहे म्हणा, त्यामुळे माज चढल्यावाणी करू नको म्हणा. असं म्हटलं आहे.

वाचा l फणस खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments