धनंजय मुंडेंबद्दल इंदुरीकर महाराज म्हणाले…

- Advertisement -

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप रेणू शर्मा यांनी मागे घेतल्याने आता मुंडेंच्या पाठीमागचे संकट संपत असल्याचे बोलले जात आहे. मुंडे यांच्या समर्थनार्थ अनेकजण समोर येत आहेत. दरम्यान धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ  आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे असे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्यावेळी तेथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सुरु होते. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सुरु असल्याचे समजताच मुंडे कीर्तन ऐकण्यासाठी बसले.

यावेळी धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, तसेच संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत, असेही इंदुरीकर महाराज यावेळी म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here