Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमराठवाडालातूरआदित्य ठाकरे थेट बांधावरती लातुर येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद

आदित्य ठाकरे थेट बांधावरती लातुर येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद

शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी चाकूर, उदगीर तालूक्यातील नळेगाव, डिघोळ येथे पेरणी करणाऱ्या शिवारातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी, कामगारांशी संवाद साधला आणि माहिती घेतली.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जन आशिर्वाद यात्रा लातूर जिल्ह्यात सुरू आहे. लातूर येथील महाविद्यालयीन युवक – युवतींशी संवाद साधून उदगीर येथे जात असताना चाकूर तालूक्यातील नळेगाव शिवारातील शेतात काम करणाऱ्या शेतकरी सुनील बिराजदार यांची त्यांनी भेट घेतली. पेरणी झाल्यानंतर कुळपणी करणाऱ्या या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी माहिती घेतली काम कसे करतात म्हणून स्वतः कोळपणीही केली. उदगीर तालुक्यातील डिघोळ शिवारात पाऊस उशीरा झाल्यामुळे आता शेतकरी पेरणी करीत आहेत. शिवारातील शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली. पेरणी कशी केली जाते याची माहिती त्यांनी घेतली व शेतकऱ्यासोबत पेरणीही केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments