Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडाकाँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आमदार अमित देशमुखांना स्थान नाही

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आमदार अमित देशमुखांना स्थान नाही

काँग्रेस पक्षाच्यावतीने स्टार प्रचारकांची यादी निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आलेली आहे. मात्र लातूरचे आमदार अमित देशमुख यांना स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने स्थानच दिलेले नाही. देशमूख समर्थकांमध्ये यामुळे अस्वस्थता निर्माण झालेली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अधांतरी असल्याची चर्चा या निमित्ताने सुरु झालेली आहे.

प्रत्येक पक्षाच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून कांही नेत्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने मोतीलाल व्होरा यांच्या स्वाक्षरीसह ४० जणांच्या नावाची यादी पाठवण्यात आलेली आहे. मात्र या यादीमध्ये लातूरचे दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांचे नावच नाही. देशमुख समर्थकांमध्ये यामुळे अस्वस्थता पसरलेली आहे.

महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अमिता चव्हाण, लातूरचे शिवराज पाटील चाकूरकर, राजीव सातव, मिलींद देवरा, संजय निरुपम, विजय वड्डेटीवार, अशोक जगताप, विलास मुत्तेमवार, हर्षवर्धन पाटील, कुमार केतकर, वसंत पुरके, अमर राजूरकर, हरिभाऊ राठोड यांच्यासह इतरांचा त्यामध्ये समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा एकहाती गाडा ओढणारे आमदार अमित देशमुख यांचे नाव मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आमदार अमित देशमुखांची सद्दी संपवल्याची भावना देशमुख समर्थकांमध्ये निर्माण झालेली आहे. आमदार अमित देशमुख यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजीतसिह पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवर्जुन बोलावले मात्र काँग्रेसच देशमुखांवर अन्याय करीत आहे ही भावना देशमुख समर्थकांमध्ये निर्माण झालेली आहे. प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये इतर युवा आणि जेष्ट नेत्यांपेक्षा आमदार अमित देशमुखांना अधिक मागणी असतानाही काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत मात्र त्यांना स्थान दिलेले नाही याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments