Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमराठवाडालातूरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अश्वजीत गायकवाडांचे तोंडभरून कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अश्वजीत गायकवाडांचे तोंडभरून कौतुक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे युवा नेते अश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांचे पक्षातील कार्यबघून त्यांचे तोंडभरून कौतुक केले. अश्वजीत सारख्या तरुणांना पक्षामध्ये भविष्यात नक्कीच चांगले स्थान मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिरसंघाजीीत गायकवाड़तून निवडणूक लढवत आहेत. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमध्ये रोडशो घेतला. रोडशोसाठी भाजपचे युवा नेते अश्वजीत अनिलकुमार गायकवाड हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नागपूरमध्ये गेले होते. अश्वजीत यांनी मुख्यमंत्र्यांच्या रोडशो मध्ये हजेरी लावून तरुणांना मतदान करण्याचे आवाहन केले. राज्याचा चेहरामोहर बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी तरुणांनी दुस-यांदा खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मतदान करुन प्रचंड मताधिक्याने निवडूण द्यावे अशी विनंती केली. तरुणांकडूनही यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला.

अश्वजीत अनिलकुमार गायकवाड हे उदगीर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. काही वर्षांपासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघात भाजपाचा विचार पोहोचवण्यासाठी डोअर टू डोअर प्रत्यक्ष संपर्क साधून सरकारच्या योजना पोहचवण्याचे काम केले होते. तसेच भाजपच्या सक्रिय सदस्यासाठी मोठे कार्यक्रम राबविले होते.

उदगीर मतदारसंघातून अश्वजीत गायकवाडांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र, ऐनवेळेवर अंतर्गत कारणामुळे उमेदवारी बदलण्यात आली होती. तरी सुध्दा अश्वजीत गायकवाडांनी नाराज न होता आक्रमकपणे लातूर जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी अहोरात्र प्रचार केला. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, औश्याचे उमेदवार अभिमन्यू पवार, शैलेश लाहोटी, डॉ. अनिलकुमार कांबळे यांच्यासह  मित्रपक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. त्यामुळे तरुणांमध्येही नवचैतन्य पसरलं आहे.

अश्वजीत गायकवाडांच्या या सर्व कामांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली. त्यामुळे त्यांच्या कामाचा उत्साह अजून वाढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments